युवकांनी रक्तदान करून साजरा केला पुण्यतिथी सोहळा

0
403

युवकांनी रक्तदान करून साजरा केला पुण्यतिथी सोहळा

 

 

आवाळपूर :- राष्ट्रसंताचा पुण्यतिथी सोहळा म्हटलं की भजन, कीर्तन, प्रवचन, भजन दिंडी, असे कार्यक्रमा द्वारे पुण्यतिथी सोहळा साजरा केल्या जाते. मात्र पिंपळगाव येथील युवकांनी रक्तदान करून पुण्यतिथी सोहळा साजरा करून एक वेगळा आदर्श समजा पुढे ठेवला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवास सुरुवात झाली असून विवीध माध्यमाद्वारे व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केल्या जात आहे.  “आरोग्यम् धनसंपदा”..! या म्हणी प्रमाणे पिंपळगाव येथील श्री. गुरुदेव सेवा मंडळ, संघर्ष युवा मंच व समस्त गावकऱ्यांच्या वतीने पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला विशेष म्हणजे गावातील नागरिकाचे आरोग्य सुदृढ राहवे याकरिता त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर, कोरोना लसीकरण, HIV तपासणी शिबिर, व रक्तदान शिबिर घेण्यात आले.

यावेळी 40 युवकांनी रक्तदान केले, 147 नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. 22 नागरिकांनी HIV तपासणी केली. तर 115 नागरिकांनी कोरोना लस घेतली. विशेष म्हणजे या पुण्यतिथी सोहळा कार्यक्रमाला आदल्या दिवशी खासदार बाळू धानोरकर यांनी भेट देवून गावातील नागरिकांचा उत्साह द्विगुणित केला होता. सदर कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता समस्त पिंपळगाव येथील नागरिकांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here