देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोणा योध्दांचा सत्कार

0
508

देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोणा योध्दांचा सत्कार

केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांचा पुढाकार

रुपेश मंकिवार

पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी :- मागील अनेक दिवसांपासून पोंभुर्णा तालुक्यातील सेवाव्रती व्यक्तीचा सन्मान करुन त्यांना त्यांच्या कामात पुन्हा सक्रिय करण्याचे काम केमारा – देवाडा जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी केले आहे. याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त नवेगाव मोरे येथील आरोग्य सेवा कर्मचार्यांचा कोरोणा योध्दां म्हणून सत्कार करण्यात आला.

 

कोरोणा काळात आरोग्य सेवा मध्ये कर्मचाऱ्यांचा महत्वाचा वाटा होता.यात डॉक्टर,नर्स,परीचारीका, आशा, स्वच्छता कर्मचारी तसेच एंम्बुलन्स चे वाहनचालक यांचा भरीव योगदान होता. यातच कोरोणा ग्रस्तांना उपचारासाठी ने आन करण्यासाठी एंम्बुलन्स चे वाहनचालकांनी दिवस रात्र एक करत आरोग्य सेवा दिली.त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी निष्ठावंत, साहसी व कर्तव्यापरी प्रामाणिक असलेल्या तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोणा योध्दा म्हणून सत्कार कार्यक्रम राबविण्यात येत असुन नवेगाव मोरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील एंम्बुलन्स चे वाहनचालक पराग चांदेकर यांचा कोरोणा योध्दां म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोणा योध्दांचा सन्मान करण्यात आला. सत्कारात शाल श्रीफळ, सिंहावलोकन पुस्तक भेट म्हणून देण्यात आली.

कोरोणा काळात जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी निराधारांना आधार देण्याचे काम केले आहे.अपंग, निराधार, यांना मदत असो किंवा जेष्ठ नागरिकांची समस्या असो ते त्यांच्या समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.जेष्ट नागरिकांना काठी वाटप, मास्क वाटप,राशन किट, स्वच्छता किट, आरोग्य किट,आदि साहित्य निर्वाचन क्षेत्रातील नागरीकांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here