जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय गडचांदूर येथे साजरी

0
415

जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय गडचांदूर येथे साजरी

 

गडचांदूर, प्रवीण मेश्राम
कार्यक्रमाची सुरवात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. जननायक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाणा व कुरमी या आदिवासी दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे जन्मगाव उलीहातु हे रांची जवळ आहे. बिरसानी उलगुलान नावाची चळवळ सुरू केली. याच चळवळीचा मुख्य हेतू असा होता की, ब्रिटिश सरकारने संपूर्ण देशाला गुलाम बनविले आदिवासिंची जमीन हस्तगत केली. शेतकऱ्यांवर जादा कर आकारला. एकंदरीत सामान्य जनतेवर अन्याय होऊ लागले. म्हणून बिरसानी ब्रिटिशां विरूध्द बंड पुकारले. यावेळी अशा या थोर क्रांतिकारकास त्रिवार अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी शरद जोगी, प्रविण काकडे, सुनिल अरकीलवार, करणसिंग भूरानी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here