एसटी कामगाराच्या समर्थनार्थ ऑफ्रोट व बिरसा क्रांती दल यांची बाईक रॅली

0
387

एसटी कामगाराच्या समर्थनार्थ ऑफ्रोट व बिरसा क्रांती दल यांची बाईक रॅली

● तहसीलदार तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन

 

राजुरा, १५ नोव्हें. : राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलन हे एसटी कामगारांच्या शोषणाच्या विरोधातील लढा आहे. एसटी कामगारांना असलेले अल्प मानधन हा त्यांचा कौटूंबिक अडचणीचा डोंगर उभा करण्यास कारणीभूत ठरत आहे. यामुळे एसटी कामगार मानसिक तणावाला बळी पडत असून आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करत आहेत हे वास्तव सत्य नाकारता येत नाही.

अन्यायाच्या विरोधातील हा संविधानिक लढा असून एसटी कामगारांचा घटनात्मक अधिकार आहे. एसटी कामगारांच्या रास्त मागण्या असून त्या पूर्ण कराव्यात अशा आशयाचे निवेदन बिरसा क्रांती दलातर्फे तहसीलदार राजुरा मार्फत मुख्यमंत्री यांना आज पाठविण्यात आले.

बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने आज आफ्रोट व बिरसा क्रांती दलातर्फे बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष संतोष कुलमेथे, नरेंद्र कुलमेथे, सुधाकर कुलमेथे, प्रणित झाडे, सुरेश मडावी आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here