धनदांडके भांडवलदाराचे देशी दारूचे दुकान अखेर स्थलांतरित

0
277

धनदांडके भांडवलदाराचे देशी दारूचे दुकान अखेर स्थलांतरित

सामाजिक ऐक्याचे यश, वंचित बहुजन आघाडीचा लढा यशस्वी

 

कोरपना /प्रतिनिधी
गडचांदूर नगरीतील प्रभाग क्रमांक पाच येथील देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाला दि. 06/07/2021 ला सामूहिक पत्रव्यवहार केला. दुसरा पत्रव्यहार दि. 30/07/2021 करण्यात आला व केस न 127/2021 नुसार न्यायालयात दाद मागण्यात आली.

या सर्व प्रकरणांचा वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मधुकर चुनारकर, विनोद गोखरे, बालाजी पुरी, चरणदास नगराळे, रोहन काकडे व वॉर्डातील सर्व रहिवाश्यांनी माजी आमदार वामनराव चटप यांनी एडवोकेट वासेकर चंद्रपूर तसेच जिल्हाच्या सर्व वंचित पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात लढा लढून दुकानदाराला स्थलांतर करण्यास भाग पाडले.

या जिंकलेल्या लढाईमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मिठाई वाटून जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here