आज वणीत नक्षल कमांडर तेलतुंबडे चा होणार अंत्यसंस्कार, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक रवाना

0
1279

आज वणीत नक्षल कमांडर तेलतुंबडे चा होणार अंत्यसंस्कार, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक रवाना

 

यवतमाळ, मनोज नवले
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर शनिवारला माओवादी व पोलिसात झालेल्या चकमकित नक्षल चळवळीचे आधारस्तंभ असलेल्यांचा खात्मा करण्यात आला.

त्यात नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडे यांचा समावेश असून त्यांच्यावर आज वणी लगत असलेल्या लालगुडा येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

माओवादी छत्तीसगडमधून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी माओवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. याच वेळी जवान आणि माओवादीमध्ये चकमक देखील झाली. शनिवारी सकाळी ग्यारापतीच्या जंगलात पोलीस आणि माओवादी यांचे मधील चकमक सुरू झाली होती. यावेळी तब्बल 26 नक्षलचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यात चार जवान देखील जखमी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here