परिस्थिती बेताची पण शिक्षणाची गाेडी फार…!

0
914

परिस्थिती बेताची पण शिक्षणाची गाेडी फार…!

तेलंगणातील “ती” तरुणी सायकलने चंद्रपूर नगरीत व्रूत्तपत्रे वाटुन शिक्षण घेतेयं ……..!

 

प्रविण मेश्राम – शिक्षणा शिवाय जिवनात दुसरा पर्याय नाही याच ध्येया पाेटी ती शिक्षणासाठी तेलंगणाच्या तडपल्ली गावातुन चंद्रपूरात आली अन् चंद्रपूरच्या स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयात शिक्षण घेवू लागली. या वर्षी ती बिए अंतिम वर्षाला अाहे .तीचं पूर्ण नांव रानी सुशिल राेहने असे आहे . उच्च शिक्षण घेवून स्पर्धा परीक्षा द्यायची व नाेकरी मिळावयाची हे स्वप्न तिने मनाशी बाळगले आहे.

घरची आर्थिक फार बेताची असुन आई वडील सध्या तेलंगणा राज्यातील अशिफाबाद जिल्हा अंतर्गत येत असलेल्या तडपल्ली या गावात वास्तव्यास आहे .ते माेलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करीत आहे .तर त्याच परिवारातील राणी राेहणे ही नित्य नेमाने चंद्रपूरात राेज सकाळी विविध वर्तमान पत्रे घरपाेच वाटपाचे काम करीत आहे .त्यातुन जी काही मिळकत मिळते त्यात ती अभ्यासाची पुस्तके खरेदी करीत आहे. काही दिवसांचा सुरुवातीचा सहवास राणीचा चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात येणा-या काेची या गावात गेला.

वयाच्या आठव्या वर्षापासून ती याच गावातील हाेणां-या वंदनिय राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज यांचे सामुदायीक प्रार्थनेला नित्य जायची! त्याच वयात तिने ग्रामगिता ग्रंथाचे वाचन केले. त्यातुनच तिला श्लाेक, अंभग, भजन व पाेवाडे याची आवड मनात निर्माण झाली. आज ही त्याच गावात हाेणां-या राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांच्या कार्यक्रमाला ती जातीने हजर राहते. भल्या पहाटे उठुन हातात वर्तमान पत्रे घेवून घराेघरी वाटप करणां-या २१वर्षिय राणीचे अनेक घरी महिला व तरुणींशी मधुर व गाेड संबंध जुळल्याचे खुद्द राणी सांगते. भविष्यात उच्च शिक्षण घेवून यशाची पायरी गाठु अशी ती म्हणते. राणी ही सहजं सुचलं महिला व्यासपीठाची एक नवाेदित सदस्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here