यशाचे शिखर पदाक्रांत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा महत्वाची-सरपंच कुमारी हिमानीताई दशरथ वाकुडकर

0
797

विजय जाधव तालुका प्रतिनिधी: ‌ मुल तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक यशाचे शिखर गाठायचे असेल तर सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे असते, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, भविष्यात पुढे जायचे असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी आणि ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी केले पाहिजेत असे मत नांदगाव च्या सरपंच हिमानीताई वाकुडकर यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
शालेय अभ्यासक्रमा व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या इतरही सूक्त गुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. विद्यार्थ्यांनी आपल्या मातापित्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी व स्वतःच्या भवितव्यासाठी शिक्षण घेऊन आपली प्रगती करावी.यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्नांची परिकथा करावी असे प्रतिपादन गावच्या प्रथम नागरिक कुमारी हिमानी ताई वाकुडकर यांनी केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले नांदगावचे उपसरपंच माननीय सागर भाऊ देऊरकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय उमेश भाऊ इनमवार तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मंचावर उपस्थित असलेले मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय दशरथ भाऊ वाकुडकर यांचे शैक्षणिक सामाजिक गाव विकासावर समायोजित मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बोरीकर सर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव चे माजी सरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष माननीय प्रकाश आंबटकर, माजी सरपंच माजी राजारामजी गेडाम, ग्रामपंचायत सदस्य त्रिमूर्ती नाहगमकर, तसेच माजी उपसरपंच नरेंद्रजी नारलावार, प्रकाश गुंडावार, पोलीस पाटील प्रिन्सिपल देवताळे, प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चेतन जाधव, जनसेवा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज अहिरकर, आणि इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा कमिटीचे अध्यक्ष माननीय उमेश भाऊ इनमवार, शाळेचे संपूर्ण शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पथक परिश्रम घेतले.

विजय जाााााााााााााााााााााााा

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here