गावातील वाचनालये अद्यावत करा – डॉ. सेठी

0
485

गावातील वाचनालये अद्यावत करा – डॉ. सेठी

 

चंद्रपूर – महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, अंतर्गत भादुर्णी, कोसंबी, मोहर्ली या ग्रामपंचायतीला डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांनी भेट दिली. भेटीदरम्यान गावातील विकासकामांची पाहणी केली. मिशन गरुडझेप अंतर्गत ग्रामीण भागात वाचनालये सुरू करण्याच्या सूचना डॉ. यांनी दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत भादूरणी, कोसंबी, मोहर्ली या गावातील वाचनालयांना भेटी दिल्या.

वाचनालयाची सद्य:स्थिती जाणून घेतली. मुलांसाठी अभ्यास करण्याकरिता आवश्यक पुस्तके तसेच इतरही महत्वाच्या बाबी तिथे उपस्थित असलेल्या मुलांकडून विचारून घेतल्या. व संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सुधारणा करणेबाबत सुचना दिल्या. मौजा भादुरणी येथील महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या च्या माध्यमातून महिला उद्योग गटाने उभारलेल्या एलइडी बल्ब व्यवसायाची पाहणी केली.

गटातील अध्यक्ष आणि सदस्यांशी चर्चा करून व्यवसायाविषयी माहिती जाणून घेऊन तयार केलेल्या व्यवसायाबद्दल डॉ. सेठी यांनी महिलांची प्रशंसा केली. प्राथमिक शाळातील मुलाच्या गुणवत्तेसाठी स्वयंसेवी पध्दतीने गावात सुरू असलेल्या शिक्षणदान मोहिमेबद्दल सद्य:स्थितीचा आढावा घेतला.गावातील उपस्थित नागरिक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केली.

यावेळी गट विकास अधिकारी, पं. स. मुल मयूर कळसे व व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक, विद्या पाल, व्हीएसटीएफ तालुका समन्वयक, मॅजिक बस प्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक ,कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, बचतग गट महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here