संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात साजरा

0
453

संत श्री नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम उत्साहात साजरा

नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी च्या वतीने नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नगाजी महाराज यांची २५५ वी पुण्यतिथी श्री संत नगाजी महाराज देवस्थान कहाली खंडाळा रोड ब्रम्हपुरी उस्ताहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात ख्रिस्तानंद रुग्णालयात रुग्णसेवा व रक्तदान शिबिरापासुन करण्यात आली तर संपूर्ण शहरात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहरातील समाजबांधवांनी संपूर्ण सलुनचे दुकान बंद ठेवली.त्यानंतर समाजातीलच महिलांनी नगाजी महाराज पुण्यतिथी निमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

त्यानंतर पुण्यतिथी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अशोक रामटेके उपाध्यक्ष नगर परिषद ब्रम्हपुरी, मनोज वठे, न.से. ब्रम्हपुरी, केशवराव सूर्यवंशी,दत्तुजी मेश्राम ,राजीराम फुलबांधे , जयदेव खळशिंगे,दिवाकर फुलबांधे,गुरुदेव सूर्यवंशी ,प्रा डॉ अशोक सालोटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माणिक मेश्राम हे होते .सदर कार्यक्रमामध्ये पत्रकार बंधूंचे सत्कार करण्यात आले सोबतच कोरोना योद्यांचा सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोलू फुलबांधे सचिव यांनी केले सुत्रसंचलन मुख्य मार्गदर्शक प्रा. लक्ष्मण मेश्राम सर तर आभार प्रदर्शन उदय पगाडे यांनी केले.

प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी तर्फे अध्यक्ष विलास सुर्यवंशी, अजय खळशिंगे, लक्ष्मण मेश्राम सर, गोलु फुलबांधे, विनय मेश्राम, प्रणव सूर्यवंशी, विलास दाणे, श्रावण येळणे, पितांबर फुलबांधे, मयुरभाऊ मेश्राम, मोरेश्वर मेश्राम ,सुयोग मेश्राम, जितू फुलबांधे व सदस्य गण यांनी अथक परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here