महावितरणाचा प्रकोप व सतत पडणाऱ्या पावसामुळे चिंता ग्रस्त झाली जनता

0
365

महावितरणाचा प्रकोप व सतत पडणाऱ्या पावसामुळे चिंता ग्रस्त झाली जनता

 

कोरपना/प्रतिनिधी : ऐन पावसाळ्याच्या या दुष्काळामध्ये महावितरणाचा प्रकोप सद्या कोरपणा तालुक्यातील गडचांदूर व कोरपना या भागात पाहायला मिळत आहे. सर्वत्र पावसाने हाहाकार माजवल्यानंतर यातच या महावितरणच्या लाईट कपातीचा तडाका या भागात सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात हवाल दिल असताना यातच हाती आलेले पिके डोळ्यादेखत नष्ट होऊन चालले आहे. लाईट बिल भरायची कुठून हा प्रश्न शेतकरी व मजूर वर्गांना पडलेला आहे. पण कोणत्याही प्रकारची दयामाया न करता सरळ महावितरणच्या कर्मचारी येऊन लाईन कट करून टाकतात. काही व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात विज बिल असून सुद्धा फक्त शेतकरी मजूर यांची घरघुतीलाईट कट केली जात आहे. यातच त्यांना कोणत्याही दिवसाची सवलत न देता प्रत्यक्षात लाईट कट करून जनतेला नाहकत्रास देण्याचा सपाटा महावितरण कंपनीने उचलला आहे. आधीच पाऊस हा थांबलेला नाही व आता हे महावितरण विभाग यात शेतकरी वर्ग मजूर वर्ग बिल भरणार कुठून हाताला काम नाही. शेतातील खर्च हा प्रश्न त्यांच्यात पडल्यामुळे ते चिंताग्रस्त झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील नव्याने झालेल्या या सरकारने या गोष्टीकडे तात्काळ लक्ष देऊन महावितरणातील होणारा जनतेला त्रास या गोष्टीकडे मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज पडत आहेत. या भागात सध्या कोरपना तालुक्यात संपूर्ण लाईट बिल न भरल्यास वितरण सेवा खंडित केल्या जात आहे. यातच हा दुष्काळ यात काही शेतकरी व मजूर वर्गांना सवलत देण्यात यावी अशी जनतेची आर्त हाक ह्या भागातील जनतेनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here