लोकमान्य टिळक महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला

0
430

लोकमान्य टिळक महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त व्याख्यानमाला

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले

आपली ही वसुंधरा सर्वच प्राणीमात्रांचे आश्रय स्थान आहे. या सगळ्यांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे. माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रत्येक वृक्ष आणि प्राण्यांच्या अस्तित्वाची अनिवार्यता लक्षात यावी या दृष्टीने संपन्न होत असलेल्या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक महाविद्यालयात वनस्पती शास्त्र आणि प्राणी शास्त्र या विभागांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसाच्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
पहिल्या दिवशी डॉ. प्रवीण जोशी यांनी “पक्षी -निसर्ग संवर्धक” या विषयावर मार्गदर्शन करतांना निसर्गाच्या जोपासण्यात पक्षांचे असणारी स्थान स्पष्ट केले. त्यांच्याद्वारे होणाऱ्या विविध क्रियांच्या माध्यमातून निसर्गाचे कसे संवर्धन होते ते स्पष्ट केले.
दुसऱ्या दिवशी डॉ. रमजान विराणी यांनी “वन्यजीव संवर्धन सद्यस्थिती व मनुष्य प्राणी संघर्ष” या विषयावर बोलत असताना निसर्गातील विविध घटकांच्या सहसंबंधांचे स्पष्टीकरण करून केवळ माणूसच या यंत्रणेला खराब करतो. अनेकदा चांगल्या हेतूने हाती घेतलेल्या कामातून देखील शास्त्रीय माहिती नसल्याने आपण निसर्गाचे नुकसानच कसे करतो हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले.
तिसऱ्या दिवशी डॉ. जयंत वडरकर यांनी सामान्यतः दुर्लक्षित असणाऱ्या घुबडाच्या जीवनावर अनेकांगी प्रकाश टाकला. त्याचे प्रकार, त्याच्या क्षमता, त्याची शारीरिक वैशिष्ट्ये , त्यात होत गेलेले बदल, त्यांची अन्नसाखळी, जीवन यात्रा अशा अनेक गोष्टीवर रोचक माहिती प्रदान केली.
चौथ्या दिवशी डॉ. अनिल कोरपेनवार ट्रिपल यांनी महाराष्ट्रातील विभिन्न वनस्पतींची सद्यस्थिती या विषयावर मार्गदर्शन करताना वनस्पतींच्या संवर्धनाचे विविध पैलू स्पष्ट केले.
या उपक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानजोडे यांनी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना या माध्यमातून मान्यवरांच्या कामाची ओळख करून घेण्याच्या आणि त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेण्याच्या मिळत असलेल्या संधीबद्दल आनंद व्यक्त केला.
या सर्व वक्त्यांचा परिचय दोन्ही विभागांचे प्रमुख डॉ. ज्ञानेश्वर खामनकर आणि डॉ. रवींद्र मत्ते यांनी करून दिला.
व्याख्यान मालिकेचे संचालन डॉ. परेश पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अजय राजूरकर यांनी केले.
कार्यक्रमाची तांत्रिक बाजू डॉ. गुलशन कुथे आणि डॉ. महादेव भुजाडे यांनी सांभाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here