शुल्लक कारणावरून युवकास बेदम मारहाण, शेलू खुर्द येथील घटना

0
489

शुल्लक कारणावरून युवकास बेदम मारहाण, शेलू खुर्द येथील घटना

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

वणी तालुक्यातील सेलू खुर्द येथील एका व्यक्तीला शुलक्क कारणावरून जबर मारहाण केल्याची घटना बुधवार दि.6 आक्टॉबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडली पत्नीच्या फिर्यादी वरून गावातीलच चार जनाविरुद्ध वणी पोलीस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी साधना नरेंद्र थेरे 30 रा. शेलू खुर्द यांनी दिलेल्या तक्रारी वरून तिचे पती नरेंद्र थेरे रात्री 9 वाजता दरम्यान एका पानटपरीवर उभे असताना गावातील कोंबडी चोरीला जात असल्याची चर्चा करत असताना गावातील उमेश दिलीप वालकोजेवार वय 25, निलेश दिलीप वालकोजेवार वय 30, दिलीप वालकोजेवार, 55 प्रकाश सर्व रा. शेलू खुर्द तिथे आले आणि नरेंद्र सोबत वाद घालून त्याला बैलबंडी च्या उभारीने तोंडावर पायावर मारहाण केली आणि घटनेत नरेंद्र थेरे हा गंभीर जखमी झाले असून त्याला रुग्णालयात दाखल केले. फिर्यादीची तक्रार आणि मेडिकल रिपोर्ट वरून.वरील चारही आरोपीविरुद्ध कलम 326,34 नुसार गुन्हा दाखल केला असून एक आरोपी ताब्यात असून तीन आरोपी फरार आहे.पुढील तपास पो. नी. श्याम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात.पी.एस. आय. शिवाजी टिपूर्णे करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here