माेहाडी पंचायत समिती कर्मचारी व आशा कार्यकर्ता यांची SPO2 चाचणी!

0
360

माेहाडी पंचायत समिती कर्मचारी व आशा कार्यकर्ता यांची SPO2 चाचणी!

अमोल राऊत

भंडारा : काल बुधवार दि. 27 आँगष्ट रोज गुरूवारला पंचायत समिती मोहाडी येथील सभागृहात खंड विकास अधिकारी पल्लवी वाडेकर यांच्या सह संपूर्ण अधिकारी व कर्मचारी यांची SPO2 चाचणी करण्यात आली.

शासन स्तरा वरुन कोविड 19 संदर्भात जाणीव जागृती करण्यात येत असून शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच ग्राम स्तरावर शासनाच्या व आरोग्याच्या विविध योजना राबवणारा आशा कार्यकर्ता समुह हा कोरोनाच्या काळात प्राणाची पर्वा न करता सतत दिवस रात्र कार्यरत आहे. यात विशेषता आरोग्य विभाग व आशा कार्यकर्ता ह्या अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आपले कर्तव्य प्रामाणिक पणे नित्यनेमाने पार पाडत आहे. अशा स्थितीत अहोरात्र कर्तव्यावर झटत असणाऱ्या शासन सेवेच्या या वर्गाच्या आरोग्याची हेळसांड होवू नये म्हणून अनेक स्तरावर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची मागणी होत होती.

यातच SPO2 ची चाचणी घेण्याचे निर्देश वरीष्ट स्तरावरून मिळताच, विभाग प्रमुखांकडून यावर तत्परतेने दखल घेत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कार्यरत कर्मचारी, आशा कार्यकर्ता सह पंचायत समिती मोहाडी तील संपूर्ण विभागातील कर्मचाऱ्यांची SPO2 ची टेस्टींग करुन घेण्यात आली.

या चाचणी मध्ये कर्मचाऱ्यांची आँक्सीमिटरने आँक्सीजन व टेम्प्रेचर गन ने टेम्प्रेचर ची टेस्ट घेण्यात आली. ही चाचणी दोनदा करण्यात येते. प्रथम आँक्सीजन व टेम्प्रेचर टेस्ट करून त्याची नोंद घेवून, सहा मिनीट वाँक केल्यानंतर परत दुसऱ्यांदा आँक्सीजन व टेम्प्रेचर टेस्ट करण्यात येते.

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मोहाडी अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र बेटाळा येथील वैद्यकिय अधिकारी डाँ.कावळे व त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ही चाचणी घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here