उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कारवाईत तिन हायवा जप्त राजूरा तालुक्यातुन मुरमाची अवैध वाहतूक |

0
1053

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कारवाईत तिन हायवा जप्त

राजूरा तालुक्यातुन मुरमाची अवैध वाहतूक |

राज जुनघरे

बल्लारपूर:- बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी येथे मुरमाची अवैध वाहतूक करताना तिन हायवा बल्लारपूर उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी यांनी जप्त करुन बल्लारपूर तहसिल मध्ये जमा केल्या आहेत. याचसोबत बांधकाम स्थळी दोन हायवा रेती अवैध रित्या साठवनुक केलेली आढल्याने बांधकाम ठेकेदार व वाहतूक दार या दोघांवरही कारवाई होणार आहे. यामुळे अवैध उत्खनन करून तस्करी कणारांचे धाबे दणाणले आहेत.

बल्लारपूर तालुक्यातील येनबोडी,पडसगाव मार्गांवर खाजगी कंपनीचे पत्ता गोदामाचे बांधकाम मागिल पंधरा दिवसांपासून सुरू आहे. या बांधकामासाठी लागणारे मुरुम व रेती अवैध रित्या वाहतूक व साठवणूक करून बांधकामात वापरण्यात येत असल्याचे दिसून आले. २५ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी यांनी पिक पाहणी संदर्भात येनबोडी, इटोली, मानोरा, कवळजई, पळसगाव दौरा करून परत बल्लारपूर कडे जात असताना येनबोडी, पडसगाव रोडवरील तेंदुपत्ता गोदामाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मुरुम भरलेले तिन हायवा दिसुन आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे वाहतूक परवाना दिसून आलेला नाही. सदर मुरुम राजूरा तालुक्यातुन चुनाळा येथून वाहतूक होत असल्याचे समजते. सदर मुरुम गोंडपिपरीच्या परवान्यावर येनबोडी येथे खाली करित असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाची दिशाभूल करत अवैध मुरुमाची वाहतूक सुरू होती. येथील तेंदुपत्ता गोदामाच्या बांधकामासाठी अवैध रेतीचा वापर होत असून मोक्यावर दोन हायवा रेती आढळून आली. रेतीच्या वाहतूक परवान्याची उपविभागीय अधिकारी यांनी मागणी केली असता बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराकडे रेतीचा परवाना उपलब्ध नव्हता. त्यामुळे ठेकदारावरही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कारवाईत रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत योग्य तपास करून दोघांवर कारवाईचे संकेत आहेत. पुढील तपास कळमना चे तलाठी शंकर खरुले, पळसगांव तलाठी शकुंतला कोडापे, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here