कवयित्री मंजुषा प्रकाश दरवरे यांची नियुक्ती ! अनेकांनी केले त्यांचे अभिनंदन !
किरण घाटे
भद्रावती:- साहित्यिक , सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या भद्रावती येथील कवयित्री तथा सहज सुचलच्या जेष्ठ सदस्या मंजुषा दरवरे
यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेच्या भद्रावती तालुका सचिववपदी निवड करण्यात आली आहे.
विदर्भ विभागीय अध्यक्ष आनंदकुमार शेंडे यांच्या निर्देशानुसार नागपूर विभागीय अध्यक्ष कवी सतीश सोमकुवर आणि नागपूर विभागीय सरचिटणीस जयेंद्र चव्हाण , जिल्हाध्यक्ष नीरज आत्राम चंद्रपूर यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.
कवयित्री मंजुषा दरवरे साहित्य क्षेत्रात वंचित कवी , लेखक, साहित्यिक यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या आणि आपल्या कार्याच्या माध्यमातून एक उत्तम विचारपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला आहे
अश्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या कवयित्री मंजुषा दरवरे यांचे त्यांच्या नियुक्ति बद्दल सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे
