वणी पोलिसांची कोंबड खेळाच्या जुगारावर जबरदस्त धाड

0
477

वणी पोलिसांची कोंबड खेळाच्या जुगारावर जबरदस्त धाड

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले
तालुक्यातील रासा या गावातील भवानी मातेच्या मंदिरा खाली कोंबड पक्षाच्या झुंझिवर जुगार खेळला जात असतानाच वणी पोलिसांनी धाड टाकून 1 लाख 50 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

 

 

सविस्तर वृत्त असे की ,आज दिनांक २२/०९/२०२१ रोजी सपोनि आनंदराव पिंगळे डी.बी. पथक प्रमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून ग्राम रासा ता. वणी गावाचे पश्चिम तलावाजवळ भावानी मातेचा मदिरा खाली काही इसम सार्वजनिक ठिकाणी कोंबडा या पक्षाची झुंजीवर पैश्याची बाजी लावुन हार जितचा कोंबड बाजार नावाचा जुगाराचा खेळ खेळवित आहे. अशा खबरे वरून ठाणेदार पो.नि. श्याम सोनटक्के यांचे मार्गदर्शनात डी.बी. पथक प्रमुख सपोनि आनंदराव पिंगळे यांनी व चमुसह धाड़ टाकले.

 

 

 

यामध्ये शंकर महादेव वरपटकर वय 43 वर्ष, प्रकाश उर्फ भदय नामदेव पेचे वय 36 वर्ष, मदन बापूराव बोबडे वय 30 वर्ष, देवराव शामराव अस्वले वय 60 वर्ष, बापूजी नामदेव तांदुळकर वय 62 वर्ष याना अटक करण्यात आली आहे. तसेच काही इसम आपले मो सा टाकुन पळुन गेले व घटनास्थळावरून ०४ कोंबडापक्षी नग किंमत १,१५०/- रूपये नउ लोखंडी धारदार काती किंमत १,८००/ रूपये, वेगवेगळ्या कंपनीचे व मॉडलेच्या मोटार सायकल ०३ एकुण किंमत १,३५,०००/- रूपये व नमुद इसमान कडुन एकुण नगदी ४,०००/- रुपये व एकूण २४ नग वेगवेगळया कंपनीचे मोबाईल किंमत ९,०००/- रूपये असा एकुण १,५०,९५०/- रूपयाचा मुद्देमाल मिळुन आला. मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

 

डॉ. दिलीप पाटील-भुजबळ पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. खंडेराव धरणे अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा.संजय पुज्जलवार उप वि.पो. अ. वणी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पो.नि. श्याम सोनटक्के यांचे आदेशावरून डी.बी. पथकाचे प्रमुख स.पो.नि. आनंदराव पिंगळे तसेच डी.बी. पथक कर्म पोना / अशोक टेकाळे, हरीन्द्रकुमार भारती पोकाँ / पंकज उंबरकर, दिपक वांडूसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी अनंता इरपाते, वासुदेव नारनवरे, वसीम शेख यांनी केली. पुढील तपास स.पो.नि. आनंदराव पिंगळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here