नवनिर्मीत पुलाच्या बाजुची माती खचल्याने वाहतुक बंद कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी 

0
570

नवनिर्मीत पुलाच्या बाजुची माती खचल्याने वाहतुक बंद

कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी 

पोंभूर्णा :- 

 पोंभुर्णा येथील आयटिआय जवळ असणाऱ्या नाल्यावर यावर्षी पुल बांधण्यात आले.परंतु पुलाच्या दोन्ही बाजुला माती आणि मुरम यांचा भरणा योग्य पध्दतीने न भरल्यामुळे ती माती पहिल्याच पावसात वाहुन गेली.फक्त जाण्या येण्यासाठी केवळ एकरी मार्ग शिल्लक होता.

त्या मार्गावर काल सांयकाळी जड वाहन फसल्याने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण झाला. मुल पोंभूर्णा मुख्य मार्ग बंद झाल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली.

 

मागील जुलै महिण्यात अश्याच प्रकारचा अडथळा निर्माण झाला होता.वारंवार अश्या प्रकारच्या घटनांमुळे जनते मध्ये प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे.

वरीष्ठ अधीकारी यांनी तात्काळ लक्ष देऊन संबधित पुलाच्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जनतेतर्फ केली जात आहे.

संबधित अधिकारी राजेश चव्हाण यांचेशी संपर्क साधला असता योग्य ती चौकशी करुन कठोर कार्यवाही करण्यात येईल असे सांगीतले. आजमितीस संबंधित ठेकेदाराने मुरूम भरण्याचा थातुरमातुर प्रयत्न केला असला तरी तो पुलीया नागरिकांसाठी मृत्यूला आमंत्रण देणारा ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here