कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे रानभाजी महोत्सव संपन्न

0
462

कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे रानभाजी महोत्सव संपन्न

रान भाजी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचे आर्थिक उन्नतीचे एक साधन

अहेरी (गडचिरोली), सुखसागर झाडे

 

गडचिरोली जिल्ह्यात जंगल मोठ्या प्रमाणात असून या जंगलामध्ये रानभाज्या मुबलक प्रमाणात आहेत. त्या रानभाज्या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक उन्नतीचे साधन व्हावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अहेरी येथील रानभाजी महोत्सवाच्या शुभारंभा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते.

 

 

या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान जि.प.सदस्या भाग्यश्रीताई आत्राम होत्या तर मंचावर अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,उपसभापती गीताताई चालुरकर, प्रकल्प संचालक आत्मा दागावकर,उपविभागीय कृषी अधिकारी कांबळे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात शेरडिरे, मशरूम, कडू भाजी ,तरोटा, कुढ्याचा बार, पिंपळाचा बार, अरतफरी, इत्यादी रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. या रानभाज्या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या आवडीने -चवीने खात असतात.या रानभाज्याना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या रानभाज्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना मोठा रोजगार देतात. त्यातुन लोकांना आर्थिक लाभ मिळतो. या रानभाज्या जिल्ह्याबाहेर विक्रीला नेवून त्यातून आपला आर्थिक विकास साधता येईल. त्यामुळे या रानभाज्या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक उन्नतीचे साधन व्हावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील रानभाजी महोत्सवाच्या शुभारंभा प्रसंगी केले.

 

यावेळी महीला बचत गटा कडून रान भाज्याच्या स्टॉल्स् लावण्यात आले असुन कृषि विभागातील कर्मचारी व प.स.कर्मचारी व बचत गट महिला ,शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here