शरीर सुख मागणीच्या स्पिड पोस्ट तक्रार अफवेला पूर्णविराम

0
623

शरीर सुख मागणीच्या स्पिड पोस्ट तक्रार अफवेला पूर्णविराम

वणी (यवतमाळ), मनोज नवले

 

महिलेचा शोध घेऊन पोलीस पथक तिच्या घरी गेले असता आज माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नाही व माझी मनस्थिती आज जबाब देण्याची नसल्याचे लिहून दिले. त्यामुळे ही तक्रार कोणी पाठवली असल्याच्या अफवाला पूर्णविराम मिळाला आहे.

 

 

यवतमाळ जिल्ह्याचे घाटंजी तालुक्यातील एका महिलेने माजीमंत्री तथा आमदार संजय राठोड यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार स्पीड पोस्टने जिल्हा पोलीस अधीक्षक व घाटंजी पोलीस ठाण्यात केली होती. याप्रकरणी या महिलेचा शोध घेऊन पोलीस पथक तिच्या घरी गेले असता आज माझ्या वडिलांची प्रकृती ठीक नाही व माझी मनस्थिती आज जबाब देण्याची नसल्याचे लिहून दिले. त्यामुळे ही तक्रार कोणी पाठवली असल्याच्या अफवाला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे ही तक्रार पीडित महिलेचीच असल्याची स्पष्टोक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ दिली आहे.

 

 

यवतमाळ पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ

स्पीड पोस्टने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे यांच्या नेतृत्वात विशेष चौकशी पथकाची नेमणूक केली. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, सायबर सेल, महिला व बाल प्रतिबंधक कक्ष, भरोसा सेल, अवधूतवाडी व घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचा या पथकात समावेश आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here