सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

0
442

सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन

शाळा सुरू करीत असताना सर्व विद्यार्थ्यांना Influenza आणि Pneumonia चे Vaccination करा…!

 

 

आपण खूप दिवसांनी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेत आहात. आनंदाची बातमी आहे. पण सरकारने शाळा सुरू करीत असतांना कोरोना गटातील Vaccine जे बाजारात सहज ऊपलब्ध आहे. न्यूमोनिया आणि ईन्फलूयंझा लस ही कोरोनाचा धोका २५% कमी करतात. जगभर हेही सिध्द झाले आहे की कोरोनापेक्षा ईन्फलूयंझा आजाराने मुले जास्त मृत्यू पावली आहेत. कोरोनाची लस लहान मुलांसाठी येईल तेव्हा येईल. पण तात्काळ आता या लस ऊपलब्ध आहेत. त्याचा वापर करून बालकांचे आरोग्य आपण सुरक्षित करू शकतो. आपण शिक्षण मंत्री यांना तसेच जिल्हा कलेक्टर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सीईओ यांना तशा सूचना द्यावी अशी मागणी निवेदनातून देण्यात आली.

 

 

आ. बाळासाहेब आंबेडकर सम्यक विद्यार्थी आंदोलन राष्ट्रिय अध्यक्ष आणि आद. महेश भारतीय सर सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात सदर निवेदन काल देन्यात आले त्यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा अध्यक्ष धिरज तेलंग, सम्यक चे नितेश तुरीले, नाजिम शेख, मयुर डांगे, कबीर घोडमोडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here