नांदाफाटा औद्योगिक परिसरातील कोविड लसीचा पुरवठा बंद

0
516

नांदाफाटा औद्योगिक परिसरातील कोविड लसीचा पुरवठा बंद

२३ दिवसापासुन लस नाही ; नागरिकांची भटकंती

 

 

आरोग्य विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे नांदाफाटा औद्योगिक परिसरात मागील २३ दिवसांपासून कोविड लस उपलब्ध नसल्याने येथील लसीकरण केंद्र ओसाड पडले आहेत येथील नागरिकांची लसीकरणा करिता वणवण भटकंती सुरू आहे तर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या लसीकरण केंद्रावर लसीकरणा करिता नागरिक पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे नांदाफाटा येथील लसीकरण केंद्रावर तातडीने लस उपलब्ध करून न दिल्यास येथील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

 

 

नांदाफाटा हा परिसर औद्योगिक असल्याने येथील लोकसंख्या १५ हजाराच्या वर आहेत आरोग्य विभागाकडून नांदाफाटा येथील लसीकरण केंद्राला आत्तापर्यंत १३५० लसीचे डोस पुरवल्याची माहिती आहेत जे की लोकसंख्येच्या १० टक्केही नाही कोरपना तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळेच नांदाफाटा येथील लसीकरण केंद्रावर २३ दिवसांपासून लसच उपलब्ध झाली नागी ८४ दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या अनेक नागरिकांना दुसऱ्या डोज करिता वणवण भटकून इतर लसीकरण केंद्रावर ताटकळत उभे राहावे लागते तर अनेक नागरिकांनी पहिला डोस घेतल्याला १०० दिवस होऊनही त्यांना अद्याप पावतो लसीकरणाचा दुसरा डोस मिळाला नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे शासनाकडून तिसरा लाटेचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात असून नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करावे असे वारंवार सांगितले जाते इकडे मात्र २३ दिवसापासुन लसीचा ठणठणाट आहे कोरपना तालुक्यातील आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजन व अनागोंदी कारभारामुळे नांदाफाटा येथील नागरिकांची लसीकरणाकरिता वणवण भटकंती सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे नांदाफाटा लसीकरण केंद्रावर तातडीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली असून येथील नागरीक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे

 

 

आरोग्य अधिकार्‍यांना वारंवार नांदाफाटा येथील लोकसंख्येचा विचार करून नियमित लस उपलब्ध करून देण्याची विनंती करीत आहे शासनाच्या कार्यप्रणालीनुसार आम्ही लसीकरणाचा कार्यक्रमाचे नियोजन करतो असे अधिकारी सांगतात पहिल्या डोजला १०० दिवस उलटूनही अद्याप पावतो अनेक नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध झाला नसल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे औद्योगिक परिसर व लोकसंख्येचा विचार करून तातडीने नांदाफाटा लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून द्यावी अन्यथा नागरिकांना घेऊन आंदोलन छेडले जाईल.

शिवचंद काळे
सदस्य जिल्हा परिषद सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here