नांदगाव फुर्डी येथे विज कोसळून लागलेल्या आगीत घर जळून खाक

0
744

नांदगाव फुर्डी येथे विज कोसळून लागलेल्या आगीत घर जळून खाक

गोंडपिपरी (सूरज माडुरवार)

गोंडपिपरी येथून जवळच असलेल्या नांदगाव फुर्डी येथील प्रदीप राजेश्वर भोयर यांच्या घराला आज दिनांक 30 जून रोज बुधवारला सायंकाळी 4 वाजताच्या च्या सुमारास अचानक वीज कोसळून लागलेल्या आगीमध्ये संपूर्ण घर जाळून खाक झाले आहे. घर मालक आपल्या शेतामध्ये सकाळी 10 वाजता गेले होते. अश्यातच चार वाजताच्या दरम्यान मेघ गर्जनेसह वीज कडाडुन पावसाची सुरवात झाली. अश्यातच गोंडपीपरी तालुक्यातील मौजा नांदगाव फुर्डी येथील प्रदीप राजेश्वर भोयर यांच्या घरावर विजेचा भडका दिसून आला आणि घराला आग लागली .
वीज कोसळून लागलेल्या आगीमध्ये घरामध्ये भरून असलेले 24 पोते धान, 6 पोते तांदूळ, 2 पोते गहू, डाळ 50 किलो, शेती उपयोगी असलेले 30 बॅग खत, लाकडी पेटीमध्ये ठेवून असलेले तीस हजार रुपये रोख रक्कम, वीज मीटर आणि घरातील वापरात येणाऱ्या वस्तू पूर्णतः जाळून खाक झाली आहे. घरातील अंदाजे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रदीप भोयर हे संपूर्ण कुटुंबासह शेतामध्ये गेले असताना अचानक वीज कोसळून घराला आग लागलेली आहे ही बातमी प्रत्यक्षदर्शी आशिष हेपट यांनी घर मालकाला मोबाईल फोन वर माहिती दिली. तेव्हा त्यांनी तात्काळ शेतातील काम अर्धवट सोडून घराकडे धाव घेतली. घराभोवतालचे शेजारी आणि घर मालक यांनी तात्काळ विहिरीला मोटारपंप जोडून पाइप च्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक तासानंतर आग विझवण्यात यश मिळाले. आगीची माहिती गोंडपीपरी पोलिस स्टेशन ला कळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. तो पर्यंत गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली. पोलीस विभागाने मोका पंचनामा केला असून पुढील तपास गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय धर्मराज पटले, बिट जमादार शंकर मने करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here