छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक-शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न

0
897

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक-शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न
कोठारी ग्रामपंचायत ने स्वराज्य गुढी उभारली

प्रतिनिधी :- राज जुनघरे
कोठारी / बल्लारपूर / चंद्रपूर
शिवशके राजदंड स्वराज्य गुढी संहिता दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक शिवस्वराज्य दिन कोठारी ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या छोट्या जहागीरीचे स्वराज्यात रुपांतर केले. बलाढ्य फौज जमविली, राज्य कारभार यंत्रणा उभारली. म्हणून आज च्या दिवशी राजदंड स्वराज्य संहिता दिवस गुढी उभारून स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कोठारी ग्रामपंचायत मध्ये सरपंच मोरेश्वर लोहे, उपसरपंच सायतरा मोहुरले, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अमोल कातकर, विद्यमान सदस्य संजय सिडाम, विलास राजुरकर, राहुल सहारे, युवराज तोडे, जेष्ठ लिपिक सुरेश कंदिकटीवार, कर्मचारी सुरज कंदिकटीवार, अमोल बुटले, लाटेलवार आदिंच्या उपस्थित शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here