पारंपारिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी लोकगीत गरजेचे – आ किशोर जोरगेवार

0
255

पारंपारिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी लोकगीत गरजेचे – आ किशोर जोरगेवार

साथी महिला संगत च्या वतीने लोकगीत कार्यक्रमाचे आयोजन


माणसाची खरी संस्कृती त्याच्या पद्धतींमध्ये सामावलेली असते. लोकनृत्य, परंपरा, पारंपारिक श्रद्धा आणि लोकगीते हा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. आजच्या युगात आपल्या संस्कृतीची माहिती नव्या पिढी पर्यंत पोहोचविण्याची गरज असुन पारंपारिक संस्कृतीचे जतन करण्यासाठी लोकगीत गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
साथी महिला संगत च्या वतीने बंगाली कँम्प येथील क्रिष्ण मंदिर येथे पाखंजूर येथील श्री. श्री श्यामलाल सरकार यांच्या लोकगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजित शाहा मनोज पॉल, मनोरंजन रॉय, रिता रॉय, भानु रॉय, शालु दास, सरस्वती रॉय, यांच्या सह इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, आप-आपली संस्कृती जपण्याचे मोठे आव्हान आज समाजापूढे आहे. विदेशी संस्कृतीचे अनुसरण करत असतांना आपन आपल्या मुळ संस्कृतीकडून दुरावले जात आहोत. ही चिंतेची बाब आहे. मात्र अशात साथी महिला संगत च्या वतीने संस्कृतीचे जतन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हे कौतुकास्पद आहे. असे आयोजन नियमीत केल्या गेले पाहिजे. अशा आयोजनात समाजानेही आपला सहभाग नोंदविला पाहिजे. आजच्या युवा पिढीला अशा आयोजनाच्या माध्यमातून आपल्या सुंदर अशा पांरपारिक संस्कृतीची महती कळली पाहिजे असे यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले.
अलीकडच्या काळात भजन हा प्रकार लृप्त होणार अशी भीती वर्तविली जात होती. मात्र आता भजन हा प्रकार आणखी निखरुन समोर आला आहे. यात वारकरी समाजाचे मोठे परिश्रम आहे. आपणही आता यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून दरवर्षी महाशिवरात्रीला भजन महोत्सवाचे आयोजन करत आहोत. यंदाच्या भजन महोत्सवात विविध भाषीय 300 भजन मंडळांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यात बाल भजन मंडळांचाही समावेश होता. प्रत्येक समाजाने आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी पाल्यांना सुसंस्कृत केले पाहिजे. हे आयोजन उत्तम असुन यातुन समाजाला नवी उर्जा मिळणार आहे. आपल्या संस्कृतीचे दर्शन या आयोजनातुन समाजाला घडणार असल्याचे यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमला बंगाली समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here