चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामपंचायत व पंचायत समिती मध्ये शिवराज्यभिषेक दिन साजरा

0
491

तालुका प्रतिनिधी/रत्नदिप तंतरपाळे 

 

 

अमरावती/चांदूर बाजार (कृष्णापुर):- चांदूर बाजार तालुक्यातील सर्व गावातील ग्रामपंचायत मध्ये शिवराज्यभिषेक शिवराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्यांदाच महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात 6 जून रोजी शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. उच्च प्रतीचा भगवा ध्वज फडकवून गुढी उभारून दिन साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेवर जीवापाड प्रेम करणारे गोरगरिबांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देणारे लोक कल्याणकारी शेतकऱ्यांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

अशा आनंदी वातावरणात हा शिवराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मधील सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच पंचायत समितीमधील सभापती, उपसभापती, सदस्य जिल्हा परिषद मधील सभापती, उपसभापती, सदस्य या कार्यक्रमाकरिता उपस्थित होते. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिक सुद्धा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here