चिमूर तालुक्यात कोरोना लसीकरण लोकजागृती उपक्रम

0
429

चिमूर तालुक्यात कोरोना लसीकरण लोकजागृती उपक्रम

तालुका प्रतिनिधी

चिमूर

संपूर्ण जगात भयावह परिस्थिती कोरोना महामारीचे राक्षसी संकट पसरले आहे. संपूर्ण जग साध्यास्थितीत भितीचे सावटात वावरत आहे. रोजगार, शिक्षण व अन्य बाबी एकप्रकारे ठप्प झालेल्या आहेत. कित्येक कुटूंब उध्वस्त होतांना आपण उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहो.

परिस्थिती भयावह असतांना सुद्धा लसीकरणा विषयी असलेली भिती,अफवा गैरसमजूतीमुळे लोकांचा कल लसीकरणाकडे दिसत नसल्याचे चिञ सुद्धा पाहायला मिळत आहे. लोकांत पसरलेला गैरसमज, अफवा व भिती दूर सारण्यासाठी पंचायत समिती, चिमुरला नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांचे व मान्यवर जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी यांचे कल्पकतेतून व मार्गदर्शनात तालुक्यात प्रत्येक गावात पथनाट्याद्वारे/कलापथकाद्वारे जनजागृती उपक्रम हाती घेतलेला आहे. या लसीकरण जनजागृती मोहिमेस गावागावातून प्रचंड प्रतिसाद मिळत लसीकरणास लोक स्वतःहून प्रवृत्त होत आहे. सदरचा उपक्रम पूर्वि बहूउद्देशिय संस्थाचे प्रमुख अनिल वाकडे व संच यांचे माध्यमाने राबविण्यांत येत आहे.

—————————————-

कोरोना लसीकरण हे प्रत्येकाला जगण्याचे बळ देणारे आहे.त्यामुळे मनातील भिती,अफवा,गैरसमज दूर सारत लसीकरण मोहिम यशश्वी करण्यांस उत्तम प्रतिसाद द्यावा तथा स्वतःसह परिवारास सुरक्षित ठेवावे असे आवहान करण्यात येत आहे.

धनंजय शं.साळवे,

गट विकास अधिकारी 

पंचायत समिती, चिमुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here