राष्ट्रीय प्रतियोगिता मध्ये महाराष्ट्र प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडू चा आप तर्फे सत्कार

0
392

राष्ट्रीय प्रतियोगिता मध्ये महाराष्ट्र प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडू चा आप तर्फे सत्कार

पक्ष प्रवेश आणि पद वितरण सोहळा संपन्न

 

 

दिनांक 31 जुलाई 2022 रोजी आम आदमी पार्टी चंद्रपुर चे घुटकाळा वॉर्ड येथील पार्टी कार्यालयात ग्रेपलिंग राज्यस्तरीय स्पर्धे मध्ये चंद्रपूर मधील विजयी खेळाडू यांचा सत्कार व पक्ष प्रवेश तथा पद वितरण असे एकत्र कार्यक्रम आम आदमी पार्टी चंद्रपूर महिला अध्यक्ष ऍड. सुनीता ताई पाटील यांचा नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष श्री सुनील मुसळे यांचा अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पाडण्यात आला .

दिनांक 15-17 जुलाई ला आयोजित 10 वी राज्यस्तरीय ग्रेपलिंग अजिंक्यपद स्पर्धा , नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती . ज्या मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील विविध वजन गट मध्ये विविध पद हासिल करून चंद्रपूर चे नाव रोशन केले आहे . या मध्ये 71 kg मध्ये मुकेश कुमार पांडे ने 2 सुवर्ण पदक, 58 kg मध्ये विजय कुमार गिरी ने रजत पदक हासिल केले. मुली मधून कु निर्जला अनिल कराडे ने 2 रजत पदक, 49 kg मध्ये कु आर्य मधुकर शेंडे ने रजक पदक हासिल केले.

18 ते 21 ऑगस्ट 2022 रोजी हरियाणा येथे आयोजित राष्ट्रीय प्रतियोगीता मध्ये महाराष्ट्र प्रतिनिधित्व करणार आहेत. अश्या या खेळाडूंना मुमेंटो, शाल, श्रीफळ, गुलदस्त्ता देऊन प्रोत्साहित केले.

तर दुसऱ्या स्तर मध्ये घुटकाळा वॉर्ड मधील कार्यालयात 100 महिलांनी पक्ष प्रवेश केले व त्यांना पद वितरण केले. या सम्पूर्ण कार्यक्रम मध्ये जिल्हा कोषाध्यक्ष भीवराज सोनी , सचिव दोरखंडे , शहर सचिव राजुभाऊ कुडे, युवा नेतृत्व संतोष बोपचे सर ,आरती ताई आगलावे महीला सचीव, जासमीन शेख महीला उपाध्यक्ष, रुपा ताई कातकर महीला उपाध्यक्ष, शबनम शेख महीला कार्यकारी अध्यक्ष, सिकंदर सागोरे, सुनील सदभैया, इत्यादी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here