बल्लारपूर ग्रामीण रूग्णालय येथिल ईसिजी टेक्निशियन पदाचा प्रश्न निकाली

0
404

बल्लारपूर ग्रामीण रूग्णालय येथिल ईसिजी टेक्निशियन पदाचा प्रश्न निकाली

 

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे यश

 

प्रतिनिधी :- राज जुनघरे

 

करोना काळात बल्लारपूर येथील ग्रामीण रूग्णालयात ईसिजी टेक्निशियन हे पद दिर्घकाळ रिक्त असल्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता माजी अर्थ व नियोजन मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर ग्रामीण रूग्णालय येथे ईसिजी टेक्निशियन या पदावर विशेष बाब या स्वरूपात कर्मचारी पदस्थापना करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या आदेशानुसार कु. विभा रामटेके यांची पदस्थापना सदर पदावर करण्यात आली आहे. यामुळे आता बल्लारपूर ग्रामीण रूग्णालयाच्या ईसिजी टेक्निशियन या पदाचा प्रश्न सुटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here