भारतीय जनता पार्टी च्या वतीने पांढरकवडा शहरातील खड्डे दुरूस्ती करणे बाबत निवेदन 

0
544

भारतीय जनता पार्टी च्या वतीने पांढरकवडा शहरातील खड्डे दुरूस्ती करणे बाबत निवेदन

 

 

 

 

पांढरकवडा शहर प्रतिनिधी 

✍🏻तनविर शेख 

आज दिनांक २३ जुन २०२१ रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद पांढरकवडा यांना भारतीय जनता पार्टी च्या वतीने शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्ती करणे आणि शहरांमधून मोठ्या वाहनांची अवैध्यरित्या होणारी वाहतूक थांबविणे बाबत निवेदन देण्यात आले.

शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत व त्या मध्ये पाणी सचलेले आहेत त्या मुळे अपघात घडू शकतो व जीवित हानी होऊ शकते,आणि टोल वचवीन्या करिता शहरामधुन मोठ्या वाहनांची अवैध्यरित्या होणारी वाहतूक होऊ नये या मुळे सुद्धा अपघात घडू शकतात ही अवैध्यरित्या होणारी वाहतूक थांबवावी या विषयांवर तातडीने कामाचे नियोजन लवकरात लवकर करणे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू व काही विपरीत घडल्यास ह्याची पूर्ण जबाबदारी संबंधित विभागाची राहिल असा इशारा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रितेश बोरेले यांनी दिला.

नगरपरिषद पांढरकवडा मुख्याधिकारी साहेब श्री.राजू मुत्तेमवार यांनी या कामाची दखल त्वरित घेऊ व लवकरात लवकर या सर्व विषयांवर मार्ग काढू असे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा नगरसेवक बंटी जुवारे भाजपा युवा मोर्चा व उत्तर भारतीय मोर्चा चे धीरज शर्मा, मनोज त्रिशूलवार, प्रमोद राऊत, सागर कानोजे, विशाल दुबे, शुभम घोडमारे, शुभम जुनघरे, वीरू बैंस, प्रज्वल जुमनाके, समीर गेडाम असे अनेक भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here