माणिकगड सिमेंट कंपनीच्या सुरक्षारक्षकाने नळाची तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रहारची मागणी
मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशा नंतर नगर परिषद ने लावलेल्या नळाची तोडफोड जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशाची अहेवेलना

प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
गडचांदूर शहरातील एकमेव वसाहत जिथे शासनाच्या वा मानवाच्या कोणत्याच मूलभूत सुविधा मिळू न देणे अश्या बंगाली कॅम्पला 35 ते 40 वर्षा पासून संघर्षमय जीवन जगण्यास भाग पडणारी माणिकगड सिमेंट कम्पनी विरुद्ध प्रहार ने कंबर कसली असून त्याचे फळ मिळणे सुरु झाले असून ना. मा. बच्चू कडू राज्यमंत्री माहिला बालकल्याण विभाग याना अंगणवाडी साठी पाठपुरावा करून प्रशासकीय मंजूरी मिळवून देण्यात आली असून त्याचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे बंगाली कॅम्पच्या मूलभूत सुविधा बाबत अनेक शासकीय पत्र व्यवहार केले, अनेक आंदोलने केले, निवडणुकीवर बहिष्कार टाकला, वीज वितरण कंपनी, व नगर परिषद ला घेराव टाकला तरी मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही पाहून नवनियुक्त जिल्हाधिकारी अजय गुल्हाने साहेब याना आज पर्यन्त चे सम्पूर्ण पत्र , निवेदन देऊन त्यांची भेट घेतली असता लगेच त्यांनी या विषयाबद्दल सभेचे आदेश दिले मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी दि 23 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालय वीस कलमी सभागृहात सभा बोलावली त्यात नगर परिषद मार्फत पाण्याची व्यवस्था करण्यास आदेश देण्यात आले त्या हेतूने नगर परिषद ने तीन नळांची व्यवस्था बंगाली कॅम्प येथे करून दिली , पण अज्ञाना ना हे पाहवस वाटले नाही आणि दि. 20/3/2021 ला माणिकगड सिमेंट कम्पणीचे सुरक्षा अधिकारी दीपक मत्ते व त्याचे सहकारी यांनी बंगाली कॅम्प येथे येऊन नगर परिषद ने लावलेल्या नळांची तोडफोड करण्यास सुरुवात केली तेथील रहिवासी आरडाओरड करत धावत सुटले सुरक्षा रक्षकाला विचारणा केली असता नगर परिषद ने नळ काढायला सांगितले, रहिवास्यांना शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली रहिवाश्यांचा उद्रेक बघून दीपक मत्ते सुरक्षा अधिकारी पळून गेला एकीकळे जगात जल दिन साजरा केला जातो तर दुसरीकळे मानवाला पाणी पीण्यापासून अडवल्या जाते 35 / 40 वर्षा नंतर लागलेले नळ पाहून कॅम्प च्या रहिवाश्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले दोन दिवसातच त्यांच्या आनंदावर माणिकगड कम्पनीने विरजण टाकले
प्रहार या सर्व गोष्टी ला घाबरणार नाही माणिकगड सिमेंट कंपनी व सुरक्षा अधिकारी दीपक मत्ते याच्या विरुद्ध जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाची अहवेलना करणे, नगर परिषद चे खोटे नावसांगून थोडफोड करणे, शासकीय मालमतेचे नुकसान करणे, नागरिकांना जीवनाशक्य वस्तू पाण्यापासून प्रवृत्त करने याना हेरून जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर, मुख्यधिकारी नगर परिषद गडचांदूर, पोलीस स्टेशन गडचांदूर, ला तक्रार करून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले निवेदन देताना प्रहारचे सतिश बिडकर पंकज माणूसमारे, अरविंद वाघमारे, सुरज बार, महादेव बिश्वास, सत्वशीला घुले, शोभा मेश्राम,असत दत्त, विसवनाथ पतंगे, ललिता सोरते आदी उपस्थित होते.