गाव करी ते राव ना करी, अखेर गावकऱ्यांच्या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल.

0
798

गाव करी ते राव ना करी,
अखेर गावकऱ्यांच्या निवेदनाची सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल.

Impact 24 news
तालुका प्रतिनिधी/पुरुषोत्तम गेडाम

झरी जामणी / यवतमाळ :- अडेगाव रस्त्याच्या दैनिय अवस्थेला बांधकाम विभागाची मलम पट्टी

गावकरी जागृत तर प्रशासन जागृत होणारच

बांधकाम विभाग मारेगाव अंतर्गत अडेगाव -खडकी मार्ग निर्मित झाला असून तो मार्ग पूर्ण खड्डेमय झालेला होता रस्त्यावर मोठे मोठे खड्डे आणि अनेक छोटे पूल तुटलेल्या अवस्थेत आहेत.या मुळे रस्त्याची अवस्था पाहता अडेगाव,गावातील नागरिकांना या खड्डेमय रस्त्या मुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रोगी जसे डॉक्टर कडे जातात तसे गावाकऱ्यानी रस्त्याची स्तिथी लक्षात घेता तो अडेगाव- खडकी रस्ता अपघाताला आमंत्रण देत आहे ह्या आजारा सोबतच खातेरा नदीवर दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम जोरदार सुरू असल्याने याच रस्त्यावरवरून मोठी वाहतून भविष्यात होणार आहे पण या रस्त्याची अवस्था खूप बिकट होत असून मोठे मोठे खड्डे पडले आहे हाच मुद्दा घेऊन रस्ता आजारी असल्याने अडेगावातील गावकऱ्यांनी निवेदन दिले होते सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव यांनी तात्काळ दखल घेऊन कामाला सुरुवात केली व गावकऱ्यांच्या कामाला यश मिळाले आहे.तर आजारी असलेला रस्ता बरा होत आहे. त्या मुळे गावाकऱ्यानी समाधान व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here