पालम तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करण्यासाठी सचिवांनी प्रयत्न करावे :- गणेश रोकडे

0
639

पालम तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करण्यासाठी सचिवांनी प्रयत्न करावेत गणेशराव रोकडे

परभणी जिल्हा प्रतिनिधी
आरूणा शर्मा

पालम तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करण्यासाठी सर्व सचिवांनी तसेच बँकेतील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेशराव रोकडे यांनी पालम येथे तालुका सचिव पदी महादेव सोन्नर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले व्यासपीठावर तालुका तपासणीस मुक्तेश्वर नरवाडे प्रकाश जाधव,सहाय्यक निबंधक कार्यालयातील समाधान पवार,माजी सभापती डॉक्टर रामराव उंदरे, माजी सरपंच लक्ष्मणराव रोकडे,
माधवराव गायकवाड, प्रल्हादराव कराळे, शिवाजीराव दिवटे,भगवान उंदरे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना गणेशराव रोकडे म्हणाले की तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा होण्यासाठी बँक लेव्हलवर ती स्वतः प्रयत्न करीत आहे वेळेवर कर्ज पुरवठा वाव्हा यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व संचालकांकडून प्रयत्न केले जात आहेत तसेच प्रयत्न तालुक्यातील सचिवांनी सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी प्रयत्न करून त्यांना कर्ज वाटप करावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेशराव रोकडे यांनी सत्कार प्रसंगी केले तालुका सचिव पदी महादेव सोन्नर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पालम येथे करण्यात आला या कार्यक्रमाला बळीराम भागवत,व्यंकटराव शिंदे, शिवाजी राऊत,भाऊसाहेब पौळ,लक्ष्‍मण बागल, रघुनाथ बस्के रमाकांत पाऊल शेटे यांच्या सह तालुक्यातील चेअरमन बँकेतील अधिकारी कर्मचारी सहाय्यक निबंधक कार्यालयातील कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here