तिवसा तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची बे माप लूट.

0
462

तिवसा तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची बे माप लूट.

लढा संघटना करणार आंदोलन

जिल्हा-प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती/तिवसा :- सध्या सर्वत्र ग्रामीण भागात शेती पेरणी आणि बँकेतून पीक कर्ज घेण्याची घाई. पीककर्ज काढण्यासाठी प्रामुख्याने स्टॅम्प पेपर ची आवश्यकता असते ,ते स्टॅम्प पेपर मिळण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे सरकार नोंदणी कृत असलेले मुद्रांक विक्रेता.सगळ्यांना त्यांच्या पासूनच विविध कामासाठी स्टॅम्प पेपर विकत घ्यावे लागते.जेवढ्या रकमेचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो तेवढीच रक्कम ग्राहकाकडून आकारली जावी आणि त्याची रीतसर पावती मुद्रांक विक्रेत्यांनी द्यावी हे अपेक्षित व नियम आहे परंतु असे होतांना कुठंच दिसत नाही.

•५००/-₹  च्या पेपर चे ९००/-₹  घेतले.•

तिवसा तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक मुद्रांक विक्रेता आपली बस्तान मांडून बसलेले आहे. त्यांच्या कडे ग्रामीण भागातील शेतकरी असो,विद्यार्थी असो,शेत जमिनीचा व्यवहार करणारी मंडळी असो सगळेच स्टॅम्प घेण्यासाठी जातात परंतू गरीब असो वा सुशिक्षित यांच्या कडून मुद्रांक विक्रेता स्टॅम्प पेपर चे अव्वाच्या सव्वा रुपये घेण्याचे काम करतात.

असच प्रकरण लढा संघटनेचे अध्यक्ष यांच्या कडे आले. सदर शेतकरी ग्रामीण भागातून तिवसा तहसील कार्यालयात आले त्यांना ५००/-₹ चे स्टॅम्प पेपर पाहिजे होते त्यांनी एका मुद्रांक विक्रेता कडून स्टॅम्प पेपर विकत घेतले,त्या विक्रेत्यांनी ५००/-₹ च्या पेपर चे ९००/-₹ घेतले. ही बाब लढा संघटने कडे सदर शेतकऱ्यांनी सांगितली तेंव्हा सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन तिवसा तहसीलदार यांच्या कडे गेले असता त्यांना हा प्रकार माहीतच नव्हता.

ज्यांच्या कार्यालयात हा प्रकार रोज घडत आहे त्यांना हा प्रकार माहीत नाही हे कोड आहे.?

शेतकऱ्यांची अशी जर फसवणूक होत असेल तर लढा संघटना उग्र आंदोलन करेल अश्या प्रकारचे निवेदन तिवसा तहसीलदार यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here