अल्पसंख्याक विकास महामंडळावर वर पदाधिकारी नियुक्त करा ! जुनेद खानंची मागणी ! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट ! 

0
522

अल्पसंख्याक विकास महामंडळावर वर पदाधिकारी नियुक्त करा ! जुनेद खानंची मागणी ! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट ! 

 

             Impact 24 news

चंद्रपूर चिमूर ✍🏻किरण घाटे

राज्यातील अल्पसंख्याक समाजाचा विकास करण्यासाठी अल्पसंख्याक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असताना मात्र विद्यमान महाविकास आघाडी शासनाने महामंडळावर अद्याप पदाधिकारी नियुक्त केले नसल्याने कोणतेही निर्णय होत नाही .तेव्हा शासनाने अल्पसंख्याक महामंडळावर पदाधिकारी नियुक्ती करण्याची मागणी भाजप प्रदेश अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश महामंत्री जुनेद खान यांनी केली आहे.

दरम्यान त्यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांचेशी चर्चा केली. अल्पसंख्याक समाजाच्या हित रक्षणासाठी महामंडळावर पदाधिकारी नियुक्ती करण्याची मागणी भाजप प्रदेश अल्पसंख्याक आघाडी प्रदेश महामंत्री जूनेद खान यांनी केली असून या भेटी दरम्यान प्रदेश सचिव अस्लम खान ,वरिष्ठ मार्गदर्शक रमजानभाई अन्सारी अश्विन तिवारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here