राजूरा तालूक्यातील 100% लसीकरण झालेल्या धिडसी गावचा सन्मान ! कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती ! 

0
1254

राजूरा तालूक्यातील 100% लसीकरण झालेल्या धिडसी गावचा सन्मान ! कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती ! 

 

 

राजूरा चंद्रपूर -✍🏻किरण घाटे विशेष प्रतिनिधी – जिल्ह्यातील राजुरा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या धिडसी या गावात १००टक्के लसिकरण झाले असुन तालुक्यात ते गांव एकमेव ठरले आहे .आज रविवार दि.१३जूनला सकाळी धिडसी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत एक कार्यक्रम पार पडला. त्या वेळी या गावचा विशेष सन्मान करण्यांत आला .आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुदर्शन निमकर उपस्थित हाेते .तर प्रमुख पाहुणे म्हणून बिडीआे डाँ .ओमप्रकाश रामअवतार उपस्थित हाेते .या शिवाय या कार्यक्रमाला गावच्या सरपंच रितु हनुमंते,उपसरपंच राहुल सपाट,ग्रा.प सदस्य बंडु काकडे,विनोद कोरडे,सिंदुबाई निखाडे,मंगलाबाई ढोके,मायाबाई जिवतोडे,तलाठी विनाेद खाेब्रागडे , ग्रामसेविका अर्चना वरघने पाेलिस पाटील सतीश भाेयर माजी सरपंच मधुकर काळे,दत्तु ढोके, शिक्षक वर्ग, डाँक्टर मंडळी व नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.

अनेकांनी या कार्यक्रमातुन आपले मनोगत व्यक्त केले .लसिकरण साेबतच या गावचे सातबारा संगिकरण १००टक्के झाले असुन शासकीय वसुलीत ही हे गांव अग्रकमी आहे .नुकताच जागतिक पर्यावरण दिनाचा कार्यक्रम पार पडला त्या वेळेस ग्राम पंचायत , शिक्षक मंडळी तथा महसूल विभागांच्या माध्यमातुन व्रूक्षाराेपणांचा भव्य कार्यक्रम पार पडला .शासकीय याेजना व इत्तर शासकीय कार्यक्रम राबविण्यांत धिडसी हे गांव नेहमीच तालुक्यात अग्रेसर राहिले आहे . काेराेनाला राेखण्यासाठी लसीकरण करणे ही आवश्यक बाब असल्याचे मत अनेकांनी या वेळी व्यक्त केले .विशेष म्हणजे ग्रा.प. सरपंच रितु हनुमंते व अन्य धिडसी ग्रा .प. सदस्यांचे योगदान माेलाचे ठरले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here