नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पोंभुर्णा तर्फे वृक्षारोपण

0
433

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पोंभुर्णा तर्फे वृक्षारोपण..

 

Impact 24 news

चंद्रपूर/पोंभुर्णा प्रतिनिधी :- कोरोणा महामारीने वृक्षाचे महत्त्व संपूर्ण भारताने अनुभवले आहे.आक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. वृक्षतोडीमुळे आक्सिजन चे प्रमाण कमी झाल्याने हा संकट ओठवले आहे तसेच याला पर्याय म्हणून पोंभुर्णा येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी पोंभुर्णा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे याचाच एक भाग म्हणून पोंभुर्णा येथील स्मशानभूमीत दोन एकर क्षेत्रावर शेकडो झाडे लावण्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह बघेल यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला.पोंभुर्णा येथील स्मशानभूमीत शेकडो झाडे लाऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमात संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओमेश्वर पद्मगीरीवार, अशोक गेडाम, मुर्लिधर टेकाम, अविनाश कुमार वाळके, राकेश नैताम,हिमगीरी बैस, आनंद पातळे, अरुण यामावार, नंदु बुरांडे, व असंख्य सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here