अखेर कोठारी – तोहोगाव,लाठी मार्ग बंद

0
670

अखेर कोठारी – तोहोगाव,लाठी मार्ग बंद

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे धोरण नळले
यापुर्वीच दिला होता इम्फॅक्ट 24 ने इशारा.

प्रतिनिधी :- राज जुनघरे

कोठारी /चंद्रपूर /विदर्भ :-
राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंतर्गत येणाऱ्या व परसोडी – पाचगाव दरम्यान येणाऱ्या नाल्यावर पुल वाहुन गेल्याने प्रवासी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. सा. बां. उपविभाग विभागीय उप अभियंता व कंत्राटदारांच्या नियोजन शुन्यतेमुळे या भागातील प्रवासी नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागतो आहे.
Impact 24 news ने कोठारी – तोहोगाव मार्ग बंद होण्याची शक्यता वर्तविली होती. अखेर तेच घडले. गोंडपिपरी तालुक्यातील अतीदुर्गम व दुर्गम ग्रामीण भागात राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या नियोजनातून रस्ते विकास मार्गाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यापैकी कोठारी, तोहोगाव, लाठी मार्गावरील छोट्या मोठ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पुल बांधकामास सुरुवात झाली असल्याने वाहनांना वरदळीसाठी पर्यायी मार्ग पावसाचे पाणी जाण्याचे नियोजन करणे आवश्यक असते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, व कंत्राटदार, सहायक अभियंता यांच्या नियोजन शुन्यतेमुळे पर्यायी मार्ग शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने वाहुन गेला. यामुळे या मार्गावरील तोहोगाव, आर्वी, वेजगाव, सरांडी, लाठी, वामनपल्ली, सोनापुर, कुडेसावली व परसोडी आदी गावाची वाहतूक बंद ठप्प झाली.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोंडपिपरी चे उप अभियंता, सहाय्यक अभियंता, व कंत्राटदार यांच्या अडेलतट्टू व निष्काळजी धोरणामुळे मार्ग अडवणूक करून वेटीस धरल्या जात आहे. हा परिसर शेती व्यवसायाशी संलग्नित असुन सध्या शतीची मशागत व पेरणीच्या कामांना गती आली आहे. शेती संबंधित साहित्य खरेदी करण्यासाठी कोठारी बाजारपेठेत यावे लागते. शुक्रवार च्या पावसाने पुल वाहुन गेल्याने नागरीकांची परवळ झाली. रस्ते व पुलाच्या दुर्लक्षित बांधकामामुळे या पावसाळ्यात परीसरातिल नागरिकांचे नुकसान होत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे परिसरातील जनतेत संतापाची लाट पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here