उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

0
526

जालना जिल्हा प्रतिनिधी/ राजेंद्र गायकवाड 

जालना ः जालना आज राज्याचे ऊर्जा मंत्री हे जालना दौर्यावर असताना नांदेड ते जालना येत असताना जिल्ह्यातील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्याच्या गाड्यांना काळे झेंडे दाखवून राजेश टोपे मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या.

आधिक माहिती अशी की आज दि.12/6/2021 रोजी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत हे नांदेड येथून जालना कडे येत असताना. सोबत आरोग्य मंत्री व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे हे पण होते.मंठा ते जालना दरम्यान यांच्या गाड्याचा ताफा रामनगर येथे आला असताना जिल्ह्यातील भाजपाचे काही कार्यकर्ते यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून राजेश टोपे मुर्दाबाद च्या जोरदार घोषणा दिल्या. तसेच आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपाचे जालना जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ( माऊली ) शेजुळ,जालना तालुका अध्यक्ष प्रकाश टकले, तालुका सरचिटणीस प्रा. सहदेव मोरे, भाजयुमो जिल्हा उपअध्यक्ष विकास पालवे, भाजयुमो तालुका अध्यक्ष विक्रम उफाड, सोशलमिडीया प्रमुख सचिन घाडगे, विनोद राठोड, सोनु कुरेवाड व इतर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here