अपघातात वनरक्षकाचा घटनास्थळी मृत्यू

0
705

अपघातात वनरक्षकाचा घटनास्थळी मृत्यू

 

 

तालुका प्रतिनिधी/चिमूर

तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेतत्रातील बोथली(वहानगाव) येथे कार्यरत असणारे वनरक्षक सुरेश केंद्रे(३४) यांचा रविवारी सायंकाळी ११.३० सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

वनरक्षक सुरेश केंद्रे हे बोथली(वहानगाव) बिटात सायंकाळच्या सुमासरस वनक्षेत्रात गस्त करण्यासाठी गेले होते.दरम्यान कर्तव्यारून घरी खडसंगी कडे परत येत असताना वरोरा-चिमूर राष्ट्रीय महामार्गावरील वहानगाव येथील शेतशिवाराच्या परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मार्गानी प्रवास करणाऱ्या वाटसरूना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी घटनेची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांना दिली.ते लगेच आपल्या ताप्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी संबधित प्रकारची माहिती पोलीस विभागाला कळवली.मध्यरात्री १२.३०च्या सुमारास पोलीस विभागाने सदर घटनेचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले.शवाची उत्तरीय तपासणी करून त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले आहे.घटनेचा अधिक तपास शेगाव(बु.)पोलीस स्थानकाचे ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चमू करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here