वारी सामाजिक संस्था आयोजित “पालकत्वाचा’ क्लास, एक अभिनव उपक्रम!

0
640

वारी सामाजिक संस्था आयोजित “पालकत्वाचा’ क्लास, एक अभिनव उपक्रम!

चंद्रपूर, किरण घाटे विशेष प्रतिनिधी – जगभर पसरलेल्या महाभयानक कोरोनाचा फटका लहान मुलांनाही बसलायं आहे!  मुलांच्या शाळाही बंद झाल्या ! त्यातल्या त्यात मोकळ्या मैदानावरील त्यांचे मनसोक्त खेळणे ,बागडणेही बंद झाले ! एकंदरीत मुले घरातल्या घरात फार कंटाळली असल्याचे दिसून येते .इतकेच नाही तर त्यांच्या सवयी देखील बिघडत आहेत. केवळ मोबाईल आणि टि.व्ही समोर तासन तास बसत आहे. पालक व बालक यांच्यात चिडचिड व तणाव वाढल्याचे आता प्रत्यक्षात घराेघरी दिसून आले आहे. या व अश्या अनेक समस्यांना बालक व पालकांना तोंड द्यावे लागते आहे.
या सर्व बाबींचा विचार करीत चंद्रपूरच्या वारी सामाजिक बहुउददेशिय संस्थेच्या वतीने खास पालकांसाठी मंगळवार, दिनांक 1 जून 2021पासून ऑनलाईन प्रसार माध्यमांव्दारे मेंदू विज्ञान व पालकत्व या विषयी चार मालिकांच्या मार्गदर्शनपर श्रृंखलेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय खनके, उपाध्यक्ष नितेश उरवेते, सचिव प्रियंका वैरागडे यांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमूख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध बाल मानसशास्त्र तज्ञ अशोक सोनवणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेचे युट्यूब चॅनेल waree sanstha येथे दुपारी ठिक ४:३० वा होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य गणेश पोहाणे, नरेंद्र मोगरे, भारत लाकडे, चंदा येरणे, स्नेहल अंबागडे, सोनाली पोहाणे, सुचिता येनूरकर व मयूरी बालपांडे अथक परिश्रम घेत आहे .तदवतचं आपआपल्या परिसरातील पालकांना ऑनलाईन होणा-या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here