पांढरवाणीच्या शंभरकर परिवारातील आधारस्तंभ हरपला! प्रा. डाँ. जी. एन. शंभरकर यांची प्राणज्याेत मालवली

0
569

पांढरवाणीच्या शंभरकर परिवारातील आधारस्तंभ हरपला! प्रा. डाँ. जी. एन. शंभरकर यांची प्राणज्याेत मालवली
चिमूर/नेरी, किरण घाटे विशेष प्रतिनिधी : चंद्रपुर येथील जनता महाविद्यालयाचे (इतिहास विषयाचे )प्राध्यापक डॉ. जी. ए. शंभरकर यांचे कोविड आजाराने नागपूर येथील रुग्णालयात आज दि.३०मे ला पहाटे ५:३० वाजता दुखद निधन झाले. डॉ. शंभरकर यांनी कोविड-१९ सोबत लढण्याचा मोठा संघर्ष केला हाेता परंतु त्यांना त्यात यश प्राप्त झाले नाही .अखेर रविवारला त्यांची प्राणज्योत मालवली. म्रूत्यू समयी त्यांचे वय ५४वर्षाचे हाेते .सामाजिक कार्यकर्ता राहुल शंभरकर यांचे ते बंधू हाेत . चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पांढरवाणी या गावचे ते मुळ रहिवाशी असुन आर्थिक परिस्थितीवर मात करीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करुन प्राध्यापकाची नाेकरी मिळविली हाेती.अत्यंत शांत व मनविळावू स्वभाव असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार चंद्रपूर जिल्ह्यात फार माेठा निर्माण झाला हाेता .महाविद्यालयातील विद्यार्थी वर्गात अल्पकालावधीत ते लोकप्रिय ठरले हाेते .

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपुर तथा जनता महाविद्यालय, तर्फे डॉ. जी.ए. शंभरकर यांना आज भावपूर्ण श्रध्दांजली अर्पित करण्यांत आली .⬜⬜⬜दरम्यान चिमूर नेरीचे नाट्यकलावंत तथा व्यापारी सुरेश कामडी यांनी दुखवटा व्यक्त करीत प्रा.दिवंगत शंभरकर यांना आपली श्रध्दांजली अर्पित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here