बेवारस, गरीब लोकांना मदतीसाठी संस्थे बेवारस, गरीब लोकांना मदतीसाठी संस्थेला सहकार्य करा! रुग्ण हक्क आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांचे आवाहन

0
640

बेवारस, गरीब लोकांना मदतीसाठी संस्थे बेवारस, गरीब लोकांना मदतीसाठी संस्थेला सहकार्य करा!

रुग्ण हक्क आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांचे आवाहन

राजु झाडे

रुग्ण हक्क आंदोलन पुणे शहर संस्थापक तथा अध्यक्ष मा. दादासाहेब गायकवाड यांनी जनतेला गरीब, बेवारस लोकांच्या मदती साठी जनतेला आवाहन केले आहे. या संस्थे मार्फत त्यांनी सतत गरीब, बेवारस, अपंग लोकांची मदत केली आहे.
गायकवाड यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस गरीब लोकांना खाऊ घालणे तसेच जुने-नवीन कपडे दान करणे यासारखी कामे या संस्थेच्या माध्यमातून केले आहे व करत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्याला जनतेकडून जुने कपडे दान करून सहकार्य व मदत मागीतली असून जनतेने स्वतः पुढे व्हावे, जमेल तेवढी शक्य मदत व दान करण्याचे आवाहन केले आहे.
या कार्यात वंचित बहुजन आघाडीचे मा. जितेंद्र जाधव यांनी सुद्धा या संस्थेला सतत मदतीचा हात दिला आहे. सहकार्य व मदतीसाठी गायकवाड यांनी व्हाट्सअप्प क्रमांक 9823105610 यावर दूरध्वनी द्वारे अन्यथा व्हाट्सअप संदेश करून आपणही संस्थेला नवीन-जुने स्वच्छ कपडे, अंथरून पांघरून दान करू शकता असे नम्र आवाहन समाज माध्यमांद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here