गडचिरोलीचा जयंत शेंडे भारतीय वनसेवेत दाखल

0
400

गडचिरोलीचा जयंत शेंडे भारतीय वनसेवेत दाखल

काँग्रेस कमिटीने घरी जाऊन केला सत्कार

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्हा कुठेही मागे नाही. खनिज संपत्तीने श्रीमंत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील जनता गरीब असल्याचे बोलल्या जाते. जनता गरीब असलीं तरी येथिल युवकांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. याचा प्रत्यय येथिल जयंत भीमराव शेंडे याने भारतीय वनसेवेत मिळवलेल्या यशातून दिसून येते. जयंतने मिळवलेल्या यशाची माहिती मिळताच काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी शेंडे यांच्या घरी जाऊन सत्कार केला.

येथिल नगरपरिषदेचे सेवानिवृत्त मुख्य लिपिक भीमराव शेंडे यांनी लहानपणापासून जयंतला वेळोवेळी मार्गदर्शन करुन तुटपुंज्या पगारातही मुलांना उच्च शिक्षण दिले. वडिलांनी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जयंतने खूप कष्ट घेतले. या कष्टातून भारतीय वनसेवेत दाखल होता आले. प्रयत्न हेच खरे यशाचे गमक असल्याचे जयंत यांनी काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, राजेश ठाकूर, तेजस मडावी, अनिल कोठारे, शहराध्यक्ष सतिश विधाते, सोशल मीडिया सेलचे नंदू वाईलकर, जितेंद्र मुनघाटे, वसंता राऊत, काँग्रेसचे निवडणूक सेल प्रमुख सुनील चडगुलवार, जयंत शेंडे यांचे आई, वडिल, बहिण आदी उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here