शहरातील युवकांचा शहीद स्मारक करिता पुढाकार

0
219

शहरातील युवकांचा शहीद स्मारक करिता पुढाकार

चामोर्शी येथे शहीद स्मारक करिता भूखंड उपलब्ध करून देणार – आमदार डॉ. देवराव होळी

चामोर्शी/गडचिरोली, सुखसागर झाडे
गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डॉ. देवराव होळी यांचे जनसंपर्क कार्यालय चामोर्शी येथे शहरातील विविध प्रभागातील नवयुवक यांनी एकत्रित येऊन आमदार डॉ. होळी यांना निवेदन दिले.

चामोर्शी शहर वासी येथील पोलिस विभागातील विर शहीद रोशन डंबारे, भक्तदास शेट्टीवार यांचे स्मारक व्हावे यासाठी निवेदन देऊन शहीद स्मारक करिता भूखंड मिळवून देण्याची मागणी केली. यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी समस्त नवयुवकांचे मागणीचे दखल घेत तत्काळ भूखंड मिळवून देण्याचे आश्वासन दिले. समस्त युवकांचे प्रेरणास्थान येथील शहीद स्मारक व्हावे यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असे सांगितले.

यावेळी प्रामुख्याने चेतन अल्सावार, स्नेहल तुरे, कुणाल सोमनाथे, राहुल गोलाईत, गोल्डी बोरकर, पोषक गेडाम, अजिंक्य तुरे, शुभम बनपूरकर, शुभम पोटवार, महेश पिपरे, शुभम कुनघाडकर, गोटू तूरे, राकेश भैसारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here