सुपरिचित समाजसेविका श्रुती उरणकरांना काेविड याेध्दा सन्मानपत्र बहाल

0
460

सुपरिचित समाजसेविका श्रुती उरणकरांना काेविड याेध्दा सन्मानपत्र बहाल

ठाकुर्ली (ठाणे), किरण घाटे : महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समितीच्या उपाध्यक्षा , महिला उत्कर्ष (घे भरारी) शाखेच्या कार्याध्यक्षा तसेच महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या जेष्ठ सदस्या श्रुती सतिश उरणकर यांनी काेराेना संकट काळात कर्तव्यनिष्ठ राहुन स्वताच्या प्राणाची पर्वा न करता दिवस रात्र समाजसेवा केली आहे. त्यांचे या विशेष व उल्लेखनिय कामगिरी बद्दल बदलापूर येथील जनजाग्रूती सेवा समिती तर्फे त्यांना नुकतेच काेविड सन्मान पत्र देवून सन्मानित केले आहे .त्यांचे अनेक सामाजिक संघटनेशी अत्यंत निकटचे संबंध असुन त्या तेजस एंटर प्रायजेसच्या मुख्य संचालिका आहे . उल्लेखनिय बाब अशी की श्रुती उरणकर यांना या पूर्वी सुध्दा अनेक पुरस्कार व सन्मानपत्रे प्राप्त झाली आहे . त्यांना काेराेना याेध्दा सन्मानपत्र प्राप्त झाल्या बद्दल विदर्भातील सहजं सुचलंच्या मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धाेटे ,नागपूरच्या समाज सेविका मायाताई काेसरे , प्रभा अगडे , चंद्रपूरच्या सिमा भसारकर पाटील , सुविधा बांबाेडे , गडचिराेलीच्या उज्वला यमावार , राजु-याच्या अल्का सदावर्ते , सराेज हिवरे (राजुरा) श्रुति कांबळे (चंद्रपूर)प्रतिभा चट्टे (दुर्गापूर ),रसिका ढाेणे (वराेरा) पायल आमटे , मंथना नन्नावरे , सुरेखा चिडे ,पुनम रामटेके , कविता चाफले (चंद्रपूर )मनिषा मडावी (गडचिराेली) मेघा चौधरी (अमरावती )साधना वाघमारे (उस्मनाबाद )शारदा मेश्राम (लक्कडकाेट) आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here