घुग्घुस वरुन वणीकडे जाणाऱ्या ट्रकने एकास चिरडल्याने एकाचा मृत्यू

0
415

घुग्घुस वरुन वणीकडे जाणाऱ्या ट्रकने एकास चिरडल्याने एकाचा मृत्यू

मृतदेह सोबत घेऊन चक्काजाम

 

घुग्घुस बस स्टॉप येथे दुचाकीने तिघे जाताना सुभाष नगर पार्क जवळ दुचाकी स्लिप होऊन तिघेही खाली कोसळले. घुग्घुस येथून वणीकडे जाणारा वाहनाने एकास चिडल्याची घटना शनिवारी घुग्घुस येथे घडली. या घटनेत एकाच्या मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी राजीव रतन चौकात मृतदेह सोबत घेवून रात्री साडेसातच्या सुमारास चक्काजाम करण्यात आला.

फिर्यादी पेतरस रमेश चिलकावार (22) वर्ष रा.शास्त्रीनगर घुग्घुस. यांनी पोलीस स्टेशन येथे बयान दिली त्याचा बयानावरुन दुपारी २ वाजता दरम्यान अरबाज शेख (२१) वर्ष, विनय बरे (१७) वर्ष व पेतरस रमेश चिलकावार (२२) वर्ष असे तिघेही शास्त्रीनगर येथुन दुचाकीने अरबाज शेख याला बस स्टॉपवर सोडण्याकरिता जात असताना सुभाष नगर पार्क जवळ दुचाकी स्लिप होऊन तिघेही कोसळले त्यावेळेस राजीव रतन चौकाकडून येणाऱ्या एम.एच २७ सी.४०७ ट्रकने धडक दिल्याने अरबाज शेख यांच्या पोटाला गंभीर जखमी तर विनय याच्या हाताला मार लागला.

अरबाज शेख याला ताबडतोब उपचारासाठी हलविले परंतु त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.रात्री ७:३० सुमारास संतप्त नागरिकांनी मृतदेह रस्त्यावर आणुन राजीव रतन चौकात चक्काजाम आंदोलन केला.तपास घुग्घुस पोलीस करित आहे.शहरात उड्डाण पूलाचे काम सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here