श्री.म.द. भारती कन्या विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

0
494

श्री.म.द. भारती कन्या विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

 

 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 निमित्त, स्वराज्य सप्ताह अभियानांतर्गत आमच्या श्री.म.द. भारती माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात, आज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेशभूषा स्पर्धा, उत्स्फूर्त भाषण आणि गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली.

या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेकरिता शाळेचे मुख्याध्यापक रवीशेखर कोटावार, पर्यवेक्षक प्रेमकुमार नळे सर तथा सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने शाळेचा संपूर्ण पटांगण उत्साहित, आनंदित झालेला होता, या कार्यप्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. मनोज सहारे सरांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here