बल्लारपूर पोलिसांनी गांजा तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

0
651

बल्लारपूर पोलिसांनी गांजा तस्करांच्या आवळल्या मुस्क्या, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी :- राज जुनघरे

बल्लारपूर/चंद्रपूर/विदर्भ :- विश्वसनीय गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून बल्लारपूर पोलिस पथकाने राबविल्याने मोहीमेत गांजा तस्करी करणाऱ्या वाहनासह तिन आरोपिंना ताब्यात घेऊन कारवाई केली. सदर कारवाईत साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
बल्लारपूर पोलिसांना ६ जुन २०२१ रोजी राजुरा ते बामणी मार्गे चंद्रपूर कडे चार चाकी वाहनाने गांजा तस्करी होत असल्याची विश्वसनीय सुत्रांकडून गुप्त माहिती मिळताच स्थानिक पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड व रझिम मुलांनी व पोलिस ताफा घेऊन राजुरा मार्गावरील होटेल प्रिन्स जवळ व बामणी टि पौईंट परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात २५ किलो १४४ ग्राम वजनाचा गांजा याची किंमत अंदाजित २ लाख ५१ हजार ४०० रू. आणि पांढरी इंडिका विष्टा कार क़. एम एच. ३४ ए ए ५६०७ वाहनांची अंदाजित किंमत २ लाख रुपये असा एकूण ४ लाख ५१ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत गांजा तस्करी करणारे १. माधव मामिड , वय ३२ वर्षे रा. बंगाली कैम्प. शिवाजी नगर वार्ड, चंद्रपूर, २. राहुल गुडधाने, वय २३ वर्षे रा. भुरकोणी, हिंगणघाट वर्धा, ३. चंदाबाई झाडे, वय ५५ वर्षे रा. रयतवारी कौलणी चंद्रपूर, यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कारवाई सहायक पोलिस निरीक्षक एस. ठाकरे, सपोनी. विकास गायकवाड, सपोनी. रमिझ मुलांनी, चेतन टेंभुरणे, गिरीश, तिवारी, रणविजय ठाकुर, आनंद परचाके, सुधाकर वरघणे, शरद कुडे, बाबा नैताम, राकेश, अजय हेडावू, श्रीनिवास वाभिटकर, दिलिप आदे, शेखर माथनकर, महिला पोलिस संध्या आमटे, सिमा पोरते, यांनी केली. पुढील कारवाई बल्लारपूर पोलिस करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here