लढा आमचा कामगारासाठी….!
दालमिया सिमेंट कंपनी समोर मनसेचे “महाधरणे आंदोलन”
कोरपना । महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित मराठा कामगार सेनेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी गेट समोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. ‘लढा आमचा कामगारांसाठी’ असे म्हणत पुर्वीच्या मुरली सिमेंटच्या स्थायी व कंत्राटी कामगारांना कंपनीत सामावून घ्यावे, पुर्वी कंपनी कंत्राटदाराकडे कार्यरत कामगारांना कामावरून कमी करू नये, जानेवरी महिन्यात व्हेजनुसार झालेली पगारवाढ आजपर्यंत देण्यात आलेली नाही ती त्वरित देण्यात यावी, पुर्वी मुरली सिमेंटच्या स्थायी व अस्थायी कामगारांना वेजबोर्डनुसार पगार देण्यात यावा, दत्तक गांवातील लोकांना कामावर घ्यावा’ अशी मागणी करण्यात आली आहे. मराठी कामगार सेना महाराष्ट्र राज्य सचिव तथा मनसे नगरसेवक महानगरपालिका चंद्रपूर सचिन भोयर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत हिंद मजदूर संघ (HMS) केंद्रीय महासचिव फ्रांसिस दाराजी, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता, मनसे महिला जिल्हा उपाध्यक्षा मायाताई मेश्राम, चंद्रपूर मनसे महिला शहराध्यक्षा प्रतिमा ठाकूर, मनसे राजूरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कंठाळे, मनसे कोरपना तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे, माजी तालुकाध्यक्ष राजू खटोळ इतरांची प्रामुख्याने तर कामगार, नागरिकांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती. कोणताही अनुचित प्रकार घटना घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता.
